Ad will apear here
Next
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी माधुरी मिसाळ यांचा पाठपुरावा
आमदार माधुरी मिसाळपुणे : ‘शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, कोंढवा, अरण्येश्वर, टांगेवाला कॉलनी, तावरे कॉलनी, शिवदर्शन, पर्वती दर्शन, जनता वसाहत, दांडेकर पूल, पानमळा, सिंहगड रस्ता आदी भागातील पूरग्रस्त नागरिकांना येत्या तीन दिवसात संसारोपयोगी आणि जीवनावश्यनक वस्तू मिळाव्यात यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांशी संपर्क करण्यात आला असून, त्यांच्या वतीने तसेच पालिका प्रशासनाकडूनदेखील पूरग्रस्त नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत मिळेल,’ अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली. 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही माहिती दिली.

‘पुरामध्ये ज्यांची घरे पडली आहेत त्यांना त्यांचे घर उभारून होईपर्यंत दरमहा तीन हजार रुपये याप्रमाणे १२ महिन्यांचे ३६ हजार रुपये भाडे जिल्हा प्रशासनाकडून मिळेल; तसेच खर्चासाठी १५ हजार रुपये देण्यात येतील. त्याशिवाय अन्नधान्य, कपडे, भांडी अशी आवश्यक मदत स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा प्रशासनाकडून मिळणार आहे. वीज पुरवठा, पाणी पुरवठा सुरळीत करण्याबाबत; तसेच पूरग्रस्त भागातील राडारोडा, चिखल दूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे,’असेही मिसाळ यांनी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZQRCE
Similar Posts
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित पुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकारपरिषदेत दिली
पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांबाबत पैसे भरण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करावी पुणे : शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना जीआरद्वारे देण्यात आलेल्या जमिनी या संबंधित सोसायट्यांच्या मालकीच्या करण्याचे आदेश राज्य सरकारने मार्च महिन्यात काढले आहेत. या आदेशाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने त्यासाठी आकारण्यात आलेल्या भाडेपट्टीचे पैसे भरण्याची मुदत आठ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण होत आहे
महापालिकेकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे पूरग्रस्तांना दिलासा पुणे : पुराचा फटका बसलेल्या नदीकाठच्या भिडे पूल परिसरातील नागरिकांना पुणे महानगरपालिकेतर्फे रोख रक्कम आणि अन्नधान्याची मदत देण्यात आली आहे. शासकीय व प्रशासकीय यंत्रणेकडून तत्परतेने मिळालेल्या या मदतीमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language